कोरचीत मलेरिया पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीवरच

By Admin | Updated: November 25, 2015 04:06 IST2015-11-25T04:06:43+5:302015-11-25T04:06:43+5:30

संपूर्ण कोरची तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून तालुक्यातील प्रत्येक घरी रूग्ण आजाराने फणफणत

The number of pronounced malaria-positive patients increases | कोरचीत मलेरिया पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीवरच

कोरचीत मलेरिया पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीवरच

कोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून तालुक्यातील प्रत्येक घरी रूग्ण आजाराने फणफणत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी विशेष तपासणी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी कोरची तालुक्यातील मलेरियाचा प्रकोप आटोक्यात आला नाही. मंगळवारी कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात नवे आठ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून आता मलेरिया पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या २३० वर पोहोचली आहे.
कोरची ग्रामीण रूग्णालयात जवळपास नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरोग्य सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक मलेरिया रूग्णांच्या सेवेत लागले आहे. मात्र वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कोरची तालुक्यातील मलेरिया रोगाची साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. जिल्हास्तरावरील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे हे रोजच्या रोज कोरची तालुक्यातील मलेरिया रूग्णांच्या स्थितीचा आढावा भ्रमणध्वनीवरून जाणून घेत आहेत. मलेरिया रोगाच्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य संचालक कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली होती. मात्र ते बुधवारी कोरचीत दाखल झाले नाही.(तालुका प्रतिनिधी)

दिल्लीची मलेरिया सर्वेक्षणाची चमू नवेगावात
४गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया रोगाची स्थिती गंभीर आहे. जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत हजारो रूग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वाढत्या मलेरिया रोगाची कारणे जाणून घेण्यासाठी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ मलेरिया समिती धानोरा तालुक्यातील नवेगाव येथे दाखल झाली. या चमूतील सदस्य डॉ. विजय प्रकाश ओझा, डॉ. गौरवकुमार यांनी मलेरिया प्रभावित भागात सर्वेक्षण केले. नालीची अस्वच्छता, फवारणीचा अभाव, घाण पाण्याचा निचरा न होणे, मच्छरदानीचा वापर न करणे आदी कारणांमुळे धानोरा तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात मलेरियाची साथ वाढली असल्याचे समितीच्या दोन्ही सदस्यांनी सांगितले, अशी माहिती डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली.

Web Title: The number of pronounced malaria-positive patients increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.