काेराेना आकडा वाढतोय, १३ नवीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:45 IST2021-02-20T05:45:05+5:302021-02-20T05:45:05+5:30

यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित ९४४९ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९२८८ वर पोहचली. तसेच सद्या ५६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार ...

The number of patients is increasing, adding 13 new patients | काेराेना आकडा वाढतोय, १३ नवीन रुग्णांची भर

काेराेना आकडा वाढतोय, १३ नवीन रुग्णांची भर

यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित ९४४९ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९२८८ वर पोहचली. तसेच सद्या ५६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण १०५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३० टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ०.५९ टक्के तर मृत्यू दर १.११ टक्के झाला.

नवीन १३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ९ जणाचा समावेश आहे. तर चामोर्शी २, धानोरा १, व कुरखेडा तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ३ रूग्णांमध्ये गडचिरोली १, अहेरी १, चामोर्शी १ जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील महादवाडी १, सर्वोदय वॉर्ड १, कारगील चौक २, प्रगतीक स्कुल गांधी वार्ड १, कोटगल १, श्रीनिवासपुर १ मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये सुंदर नगर १, धानोरा तालुक्यांतील बाधितांमध्ये कमलगड पेंढरी १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अनकोंडा जवळ कढोल रोड १ तर इतर जिल्हयातील १ बाधिताचा समावेश आहे.

Web Title: The number of patients is increasing, adding 13 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.