सामान्य रुग्णांची संख्या राेडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:39+5:302021-04-21T04:36:39+5:30
तालुक्याच्या ग्रामीण भागात काेराेना आजाराविषयी लाेकांनी धसका घेतला आहे. साधारण सर्दी, ताप, खाेकला असला तरी काेराेना पाॅझिटिव्ह निघण्याची ...

सामान्य रुग्णांची संख्या राेडावली
तालुक्याच्या ग्रामीण भागात काेराेना आजाराविषयी लाेकांनी धसका घेतला आहे. साधारण सर्दी, ताप, खाेकला असला तरी काेराेना पाॅझिटिव्ह निघण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालुक्यातील नागरिक छत्तीसगड व तेलंगणा राज्यात जाऊ नयेत यासाठी काही दिवस सीमा बंद करण्याची गरज आहे. नागरिक कुठलीही तपासणी न करता सर्रास आवागमन करीत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका पुन्हा बळावला आहे.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी काेराेनापासून बचाव करण्याकरिता बऱ्याच प्रमाणात प्रवास टाळला; परंतु छुप्या मार्गाने येण्याऱ्या लाेकांमुळे काेराेनाचा धाेका वाढला हाेता. सध्या तालुक्यात काेराेनाचे कमी रुग्ण असले तरी संसर्गाचा धाेका अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे व सतर्कता बाळगणे हाच एकमेव उपाय आहे.