दुष्काळी गावांची संख्या वाढणार
By Admin | Updated: November 18, 2015 01:29 IST2015-11-18T01:29:46+5:302015-11-18T01:29:46+5:30
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे.

दुष्काळी गावांची संख्या वाढणार
रबी पिकांची : सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर
गडचिरोली : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामुळे पूर्वीपेक्षा आता दुष्काळी गावांच संख्या वाढणार असून दुष्काळी परिस्थितीमध्ये मिळणाऱ्या सवलतीचा लाभ या गावांना मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप गावांपैकी पिके नसलेली ६१ गावे आहेत. यामध्ये धानोरा तालुक्यातील ६, चामोर्शी ६, अहेरी ६, एटापल्ली ३, भामरागड २१ व सिरोंचा तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे. खरीप गावांमध्ये १ हजार ५३१ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२७, चामोर्शी १८९, मुलचेरा ६९, देसाईगंज ३८, आरमोरी ९१, कुरखेडा १२८, कोरची १३३, अहेरी १२४, एटापल्ली १९७, भामरागड १२८ व सिरोंचा तालुक्यातील ८२ गावांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने काढलेले ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२२, चामोर्शी २६, देसाईगंज १७, आरमोरी ९७, कुरखेडा १२३, कोरची १२७, अहेरी ११८, एटापल्ली १९४, भामरागड १०७ व सिरोंचा तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावांमध्ये ३०७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील १५७, मुलचेरा ५९, देसाईगंज २१ व सिरोंचा तालुक्यातील ७० गावांचा समावेश आहे. चामोर्शी, मुलचेरा व सिरोंचा तालुका वगळता इतर तालुक्यातील सुधारित पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यामुळे या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.