काेराेनाबाधितांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:55+5:302021-05-17T04:34:55+5:30

जिल्ह्यात एकूण ६२३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज आठ नवीन मृत्यूमध्ये ६२ वर्षीय पुरुष रामपुरी वाॅर्ड गडचिरोली, ...

The number of carnivores decreased | काेराेनाबाधितांची संख्या घटली

काेराेनाबाधितांची संख्या घटली

जिल्ह्यात एकूण ६२३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज आठ नवीन मृत्यूमध्ये ६२ वर्षीय पुरुष रामपुरी वाॅर्ड गडचिरोली, ७२ वर्षीय पुरुष आमगाव ता.देसाईगंज, ५५ वर्षीय पुरुष व्याहाळ सावली. जि. चंद्रपूर, ८७ वर्षीय पुरुष राजेंद्र वाॅर्ड ता. देसाईगंज, ७० वर्षीय पुरुष पालोरा ता. आरमोरी, ४० वर्षीय पुरुष देयोपायली ता. नागभीड जि. चंद्रपूर, ४५ वर्षीय पुरुष येंनगला ता. आरमोरी, ३७ वर्षीय पुरुष गट्टा ता. एटापल्ली यांचा समावेश आहे.

नवीन २४० बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७२, अहेरी ३७, आरमोरी १८, भामरागड ३, चामोर्शी ४२, धानोरा १०, एटापल्ली ५, कोरची ३, कुरखेडा ५, मुलचेरा ७, सिरोंचा १६ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितामध्ये २२ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ४१६ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १४१, अहेरी ३०, आरमोरी ४४, भामरागड १७, चामोर्शी ४७, धानोरा २०, एटापल्ली १७, मुलचेरा ९, सिरोंचा ३८, कोरची ४, कुरखेडा २८ तसेच देसाईगंज येथील २१ जणांचा समावेश आहे.

Web Title: The number of carnivores decreased