एनएसयूआयची गोंडवाना विद्यापीठावर धडक
By Admin | Updated: September 20, 2016 00:53 IST2016-09-20T00:53:09+5:302016-09-20T00:53:09+5:30
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन एनएसयूआच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली.

एनएसयूआयची गोंडवाना विद्यापीठावर धडक
कुलगुरूंसोबत चर्चा : शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश; समस्या सोडविण्याची मागणी
गडचिरोली : विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन एनएसयूआच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली. कुलगुरूंना निवेदन देऊन या मागण्यांसंदर्भात चर्चा केली.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विषय संख्येनुसार आकारण्यात यावे, विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी बूक बँक चालू करावी, कुलगुरूंनी दर महिन्याला प्रत्येक विभागानुसार विद्यार्थी परिषद घ्यावी, उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी द्यावी, परीक्षा व मूल्यांकन याकरिता आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. मूल्यांकणाचे काम ४५ दिवसांत पूर्ण करावे, पुनर्मूल्यांकन आणि बॅकलॉग पेपरमध्ये ठराविक दिवसांचा अवधी असावा, पुनर्मूल्यांकनाचा निकाल १५ दिवसांत लावावा. विद्यापीठातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, पुनर्मूल्यांकणामध्ये कोणत्याही विषयात १० टक्के गुण वाढल्यास मूळ उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांवर दंडात्मक कारवाई करावी, पूर्णवेळ प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती तत्काळ करावी, शिष्यवृत्तीधारकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला जेवढी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे तेवढी रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांसाठी एनएसयूआयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोंडवाना विद्यापीठावर धडक दिली.
आंदोलनाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, एनएसयूआयचे अध्यक्ष नीतेश राठोड यांनी केले. शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. चर्चेदरम्यान या मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा लता ढोक, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, राकेश गणवीर, लॉरेन्स गेडाम, एटापल्ली एनएसयूआय तालुकाध्यक्ष आकाश मुजूमदार, चामोर्शी अध्यक्ष राकेश मुनगेनवार, युवक काँग्रेस महासचिव कुणाल पेंदोरकर, पं. स. सदस्या अमिता मडावी, प्रवीण इंदूरी, गोल्डी इंगोले, नीतेश बाळेकरमकर, वैैभव भागडकर, कमल मंडल, राज सोनुने, मोहन कामेवार, अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार, नितीन पल्लेलवार, राकेश लोहंबळे, पुनेश मडावी, सचिन कोटरंगे, मनीष दुर्गे, शुभम दुर्वा, अक्षय सडमेक, संतोष वाढई, अविनाश रामटेके, गौरव आलाम, नीतेश अंबादे, सौरभ फाये, अतुल गेडाम, रोशन सोरते, नेहा देशमुख, नीकिता नरड, प्रीती बोरकुटे, रेणुका खडसे सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)