न.प. शाळांच्या शिक्षकांचे वेतन थकले
By Admin | Updated: March 14, 2015 00:19 IST2015-03-14T00:19:13+5:302015-03-14T00:19:13+5:30
येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

न.प. शाळांच्या शिक्षकांचे वेतन थकले
गडचिरोली : येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या शिक्षकांना मागील १७ वर्षांपासून पदोन्नती मिळाली नसून, चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची रक्कम येऊनही पाच वर्षांपासून शिक्षकांना झुलवत ठेवण्यात येत असल्याने नगर परिषद प्रशासनाप्रती कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोलीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर १९९८ मध्ये शहरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. तेव्हापासून नगर परिषदेने शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात नगर परिषदेतर्फे चालविण्यात येणाऱ्या १० शाळा असून, ५१ शिक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रामनगर येथील जवाहरलाल नेहरु उच्च प्राथमिक शाळेला अलिकडेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. शिक्षण विभाग, नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. नगर परिषद शाळांतील शिक्षकांना दरमहा वेतन मिळत नाही. मागील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे
वेतनाबरोबरच या शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची थकबाकीही मागील ५ वर्षांपासून अदा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम शिक्षण उपसंचालकांकडून नगर परिषदेला आधीच प्राप्त झालेली आहे. या शिक्षकांना पदोन्नतीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)