उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:23 IST2017-08-30T01:23:15+5:302017-08-30T01:23:31+5:30

शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Now seven-point program for income generation | उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

उत्पन्न वाढीसाठी आता सात कलमी कार्यक्रम

ठळक मुद्देदुप्पट वाढीचे लक्ष्य : शेतीसह प्रक्रिया उद्योगाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभागाकडून पुरविले जाईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोनापूर (गडचिरोली)चे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प ते सिद्धी’ या कार्यक्रमाचे आयोजन येत्या ३१ आॅगस्टला गडचिरोलीत करण्यात आले आहे. त्यात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी राबविल्या जाणाºया सात कलमी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम राबविताना समन्वयकाची भूमिका कृषी विज्ञान केंद्राला पार पाडायची आहे. शेतकºयांमध्ये जाणीव- जागृती निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी कृषी विज्ञान केंद्राकडे देण्यात आली असल्याचे डॉ.तांबे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी राबवायच्या सात कलमी कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून केले जाणार आहे.
त्याबाबत अधिक माहिती देताना डॉ.तांबे यांनी सांगितले, गडचिरोली जिल्ह्यात दुग्ध उत्पादनासह इतर अनेक गोष्टीतून उत्पन्न वाढीसाठी भरपूर वाव आहे. परंतू पुरेशा माहितीचा अभाव आणि गैरसमज यामुळे लोक त्याकडे वळलेले नाहीत. त्यांना यासाठी प्रवृत्त करून आधुनिक शेतीकडे त्यांचा कल वाढविणे, चांगले बियाणे शेतकºयांना मिळतील यासाठी त्यांची गुणवता वेळोवेळी तपासून शेतकºयांची फसवणूक थांबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
३१ आॅगस्टला होणाºया कार्यक्रमात शेतकºयांना कृषी शास्त्रज्ञांचेही मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.डी.एम. मानकर राहणार आहेत. पत्रपरिषदेला डॉ.विजय कदम, ज्ञानेश्वर नाथाडे, डॉ.अनिल तारू, योगिता सानप, पुष्पक बोथीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Now seven-point program for income generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.