आता केवळ १०७ कोरोनारुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST2021-01-20T04:35:58+5:302021-01-20T04:35:58+5:30

गडचिराेली : जिल्ह्यात आता कोरोनारुग्णांची संख्या चांगलीच कमी झाली आहे. मंगळवारी केवळ चार नवीन काेराेनाबाधित आढळून आले आहेत, तर ...

Now only 107 coronary patients | आता केवळ १०७ कोरोनारुग्ण

आता केवळ १०७ कोरोनारुग्ण

गडचिराेली : जिल्ह्यात आता कोरोनारुग्णांची संख्या चांगलीच कमी झाली आहे. मंगळवारी केवळ चार नवीन काेराेनाबाधित आढळून आले आहेत, तर १३ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. त्यामुळे आता क्रियाशील रुग्ण केवळ १०७ शिल्लक आहेत.

एकूण काेराेना रुग्णांची संख्या आता ९ हजार २८५ झाली आहे. त्यापैकी ९ हजार ७३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. १०७ काेराेना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १०५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन बाधितांमध्ये काेरची तालुक्यातील पानधारी गाेटा, बुटेकसा, कुरखेडा येथील एक व देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्डातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होण्यासोबतच मृत होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

Web Title: Now only 107 coronary patients