शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याचं प्रमोशन? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्त्र डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
7
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
8
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
9
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
10
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
11
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
12
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
15
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
16
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
17
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
18
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
19
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
20
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:20 IST

चेहऱ्यावर हास्य, हातात संविधान... भूपतीसह ६१ माओवाद्यांची शरणागती!

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दंडकारण्यात तीन दशके हिंसेचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या माओवादी चळवळीचा रणनीतीकार जहाल नेता, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह तब्बल ६१ माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. बुधवारी   देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत त्या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. माओवादी गणवेशात भूपतीने रायफल मुख्यमंत्र्यांच्या हाती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती संविधान ठेवत त्याचे स्वागत केले.

नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता केवळ ३वर आली आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी सांगितले. छत्तीसगडमधील बीजापूर, सुकमा व नारायणपूर यांचा समावेश आहे. नक्षलवादाने  प्रभावित जिल्हे ६ वरून ३ पर्यंत खाली घसरल्याचे ते म्हणाले.

पतीच्या आत्मसमर्पणाने ‘तारक्का’ला आनंदाश्रूभूपतीची पत्नी व माओवादी पॉलिट ब्युरो सदस्य विमला सिडाम ऊर्फ तारक्काने १ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. पतीच्या आत्मसमर्पणाच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. आता आम्ही सामान्यांप्रमाणे आयुष्य जगणार, असे भावनिक उद्गार तिने काढले. मुख्यमंत्र्यांनी भूपती व तारक्काचा संयुक्त सत्कार केला. तसेच गडचिरोली पोलिस दलाला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

यांनी केले आत्मसमर्पणआत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भूपतीसह दोन केंद्रीय समिती सदस्य, १० विभागीय समिती सदस्य असलेल्या कॅडरसह एकूण ६१ जणांचा समावेश आहे. विवेक ऊर्फ भास्कर, स्वाती सायलू, शबीर ऊर्फ अर्जुन, जितरु ऊर्फ गंगू नुप्पो, दलसू ऊर्फ मैनू गावडे, सागर ऊर्फ सुक्कु सिडाम, पद्मा होयाम, अंजू ऊर्फ लीना चिंताकिदी, रविकुमार ऊर्फ मल्लेश मनुगाला, राजू ऊर्फ कलमसाय वेलादी, निखिल ऊर्फ राजेश लेकामी, सावी तुमरेटी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, निर्मला तारामी, सुनल कुंजाम, सागर सिडाम, निखिल लेखामी आदींचा समावेश आहे. ५४ अग्निशस्त्रांसह त्यांनी आत्मसमर्पण केले.

भूपतीसह ६१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण हे या हिंसक चळवळीच्या शेवटाकडे टाकलेले मोठे पाऊल आहे. मात्र, आता शहरी नक्षलवादाचाच धोका वाढला आहे. लढाई शस्त्रांनी नव्हे, संविधानानेच जिंकायची आहे आणि संविधानच जिंकेल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra CM: Now a fight against urban Naxalism is needed.

Web Summary : 61 Maoists, including top leader Bhupathi, surrendered to Gadchiroli police in the presence of CM Fadnavis. Bhupathi's wife had surrendered earlier. The CM emphasized fighting urban Naxalism through constitutional means. Affected districts reduced to three.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस