आता घटस्फोटाचीही होणार नोंदणी
By Admin | Updated: August 11, 2016 01:39 IST2016-08-11T01:39:33+5:302016-08-11T01:39:33+5:30
शासनाने ज्या पद्धतीने विवाहाची नोंदणी करून घेण्याची व्यवस्था केली आहे,

आता घटस्फोटाचीही होणार नोंदणी
शासनाचा निर्णय : परित्यक्तांना मिळणार हक्क
गडचिरोली : शासनाने ज्या पद्धतीने विवाहाची नोंदणी करून घेण्याची व्यवस्था केली आहे, त्याच पद्धतीने आता विवाह घटस्फोट नोंदणी देखील करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंद आणि घटस्फोट यांची नोंद घेण्याची तरतूद आरंभापासूनच आहे. मात्र बहुतांशवेळा घटस्फोट न देताच पत्नीला सोडून देणारे अनेक जण आहेत. या स्थितीत सदर व्यक्तीने दुसरा विवाह केल्यास नंतरच्या काळात वारसांचे वाद आणि न्यायालयीन खटले उभे राहत असतात. घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागते म्हणून अधिकृत घटस्फोट प्रक्रिया न करता पत्नीला सोडून देणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा परित्यक्ता महिलांना त्यांचे हक्क प्राप्त होत नाहीत. आता घटस्फोट नोंदणीमुळे या महिलांना त्यांचा हक्क मिळणार आहे. महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम १९९९ मध्ये घटस्फोट किंवा विवाह शुन्यवत केल्याचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. त्यामुळे घटस्फोटीताने मागणी केल्यास तसे प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त होऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)
या अधिकाऱ्यांवर जबाबदारी
हिंदू विवाह अधिनियम १९५५ मधील नियम (२२) अन्वये घटस्फोटाच्या हुकुमनाम्याची नोंद नगरपालिका हुकुमनाम्याची नोंद नगरपालिकास्तरावर विवाह निबंध असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. नगर पंचायतीत प्रशासक हा विवाह निबंधक आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी आहे.