आता कोरोनाग्रस्त वॉर्डात सर्वांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:09+5:302021-05-08T04:39:09+5:30
गडचिरोली : ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत त्या भागात जाऊन सर्वच घरांमधील सदस्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यास ...

आता कोरोनाग्रस्त वॉर्डात सर्वांची कोरोना चाचणी
गडचिरोली : ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत त्या भागात जाऊन सर्वच घरांमधील सदस्यांच्या अँटिजन टेस्ट करण्यास आरोग्य विभागाने सुरूवात केली आहे. शुक्रवारी (दि.७) गडचिरोलीच्या सर्वोदय वॉर्ड क्र.३ मध्ये राबविलेल्या चाचणी मोहिमेत आणखी ६ जण पॉझिटिव्ह आढळले. दाट वस्ती असलेल्या सर्वोदय वॉर्डमध्ये यापूर्वी अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाऊन आरोग्य विभागाच्या पथकाने वॉर्डवासीयांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद देत ८७ जणांनी अँटिजन चाचणी करून करून घेतली. पॉझिटिव्ह आढळलेल्या ६ जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले.
ही चाचण्यांसाठी प्रयोगशाला तंत्रज्ञ मयूर कोडापे, आरोग्य सहायक निकेश गंधेवार, एच.एस.धारणे, श्रीराम मस्के आणि आशा सेविका प्रियंका पाथोडे यांनी सहकार्य केले. या परिसरात नगर परिषदेने जंतुनाशकाची फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.