आजपासून मार्कंडासाठी दर दहा मिनिटांनी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:55 IST2018-02-11T23:54:35+5:302018-02-11T23:55:23+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असून १२ ते १९ फेब्रुवारीपासून बसगाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

From now on the bus stop every ten minutes | आजपासून मार्कंडासाठी दर दहा मिनिटांनी बस

आजपासून मार्कंडासाठी दर दहा मिनिटांनी बस

ठळक मुद्देगडचिरोली व आष्टीवरून ५१, तर चामोर्शी येथून १४ रूपये तिकीट दर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा असून १२ ते १९ फेब्रुवारीपासून बसगाड्या सुरू केल्या जाणार आहेत. गडचिरोली येथून दर दहा मिनिटात मार्र्कं डासाठी यात्रा स्पेशल बस सोडली जाणार आहे. सर्व बसेस साधारण असल्याने मार्गावर येणाऱ्या गावातील भाविकांनाही या बसमधून प्रवास करता येणार आहे.
ज्या भागातून सर्वाधिक भाविक मार्र्कं डा येथे येतात त्या ठिकाणावरून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गडचिरोली येथून मार्र्कंडासाठी ५१ रूपये तिकीट असून दर दहा मिनिटांनी बस सोडली जाणार आहे. चामोर्शी येथून १४ रूपये तिकीट असून दर पाच मिनीटांनी बस आहे. आष्टी व चपराळा येथून दर अर्धा तासाने सोडली जाणार आहे. चपराळावरून ६४ रूपये तर आष्टीवरून ५१ रूपये तिकीट आहे. चंद्रपूर ते मार्कंडा दर १५ मिनिटांनी बस उपलब्ध होणार असून तिकीट ७७ रूपये आहे. मुल येथून दर दहा मिनिटांनी बस असून २९ रूपये तिकीट आहे. व्याहाड खूर्द ते साखरीघाट, सावली ते साखरी घाटासाठी २० रूपये तिकीट असून दर एक तासाने बस सोडली जाणार आहे.
बसेसच्या नियंत्रणासाठी सुमारे ६५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. महाशिवरात्री यात्रेदरम्यानच्या बस प्रवाशी वाहतुकीची जबाबदारी एसटीचे विभाग नियंत्रक विनय गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली आगार व्यवस्थापक विनेश एल.बावणे, अहेरी आगार व्यवस्थापक युवराज राठोड, ब्रह्मपूरी आगार व्यवस्थापक पाद्धे बसव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत आहेत.

Web Title: From now on the bus stop every ten minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.