आता अंगणवाडी केंद्र द्विशिक्षकी होणार

By Admin | Updated: September 3, 2014 23:23 IST2014-09-03T23:23:09+5:302014-09-03T23:23:09+5:30

बालमनावर संस्कार करण्यासोबतच बालकांच्या आरोग्याची निगा राखत सकस आहाराचा पुरवठा करणाऱ्या अंगणवाडी केंद्रात एकच शिक्षिका (अंगणवाडी) सेविकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Now the anganwadi center will be bicentenary | आता अंगणवाडी केंद्र द्विशिक्षकी होणार

आता अंगणवाडी केंद्र द्विशिक्षकी होणार

सिराज पठाण - कुरखेडा
बालमनावर संस्कार करण्यासोबतच बालकांच्या आरोग्याची निगा राखत सकस आहाराचा पुरवठा करणाऱ्या अंगणवाडी केंद्रात एकच शिक्षिका (अंगणवाडी) सेविकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे एकाच अंगणवाडी सेविकांवर विविध बैठकांसह बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. यामुळे कार्यरत एकच सेविकेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने आता प्रत्येक अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त सेविका नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवड प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
कार्यरत अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्रातील नियमित कामाव्यतिरिक्त कार्यालयीन विविध बैठका, गावातील सर्व्हेक्षण तसेच गरोदर व प्रसुत मातांची काळजी घेण्यासाठी त्यांना आहार पुरवठा करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागते. अंगणवाडी केंद्रातील एकाच अंगणवाडी सेविकेला लिखान कामही करावे लागते. या सर्व कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त कामाचा भर पडत होता. यामुळे अंगणवाडी केंद्रातील व्यवस्था प्रभावीत होत होती. अंगणवाडी केंद्राच्या कारभारात सुसुत्रता यावी, पूर्व प्राथमिक अध्यापनाचे कार्य निरंतर सुरू राहावे, यासाठी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयाने महाराष्ट्र राज्यातील निवडक २० जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अतिरिक्त सेविकांची नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ७७१ तसेच कुरखेडा तालुक्यातील एकूण १४१ अंगणवाडी केंद्रात अतिरिक्त सेविकांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान संबंधीत सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पात्र महिलांकडून अतिरिक्त अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या अर्जाची छाणणी व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका रूजू होणार आहे.
शासनाच्या या नव्या निर्णयामुळे तसेच अंमलबजावणीमुळे अंगणवाडी केंद्रातील कारभारात सुसुत्रता येऊन सुव्यवस्थाही निर्माण होण्यास मदत होणार आहे. परिणामी अंगणवाडी केंद्रातील बालकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुपोषण निर्मुलनासोबतच सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका मिळणार असल्याने कुपोषणमुक्तीचे कार्य प्रभावी होणार आहे. यामुळे आरोग्य विभागास मदत होणार आहे.

Web Title: Now the anganwadi center will be bicentenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.