धर्मा रॉयला एमपीडीए अंतर्गत कारवाईची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 01:07 IST2017-02-19T01:07:13+5:302017-02-19T01:07:13+5:30
चामोर्शी पोलिसांनी धर्मा उर्फ धर्मराज निमाई रॉय याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

धर्मा रॉयला एमपीडीए अंतर्गत कारवाईची नोटीस
गडचिरोली : चामोर्शी पोलिसांनी धर्मा उर्फ धर्मराज निमाई रॉय याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. धर्मा रॉय याला स्थानबध्द करावयाच्या कारवाईसाठी उत्तर देण्याकरिता १७ मार्च २०१७ रोजी जिल्हा दंडाधिकारी गडचिरोली यांच्या न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आले व या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने १७ फेब्रुवारी रोजी उद्घोषणा केली आहे.
३१ डिसेंबर २०१६ च्या आदेशानुसार धर्मा रॉय याला स्थानबध्द करून चंद्रपूरच्या कारागृहात दाखल करण्याचे आदेश दिले होते. चामोर्शी पोलिसांना तसे सूचित केले होते. मात्र स्थानबध्द आदेश तामील करण्यासाठी धर्मा रॉय सापडू शकत नाही, असे निदर्शनास आले. सदर आदेश वारंट बजावणी चुकविण्यासाठी रॉय गुप्तपणे वावरत आहे, असे पोलिसांनी सांगितले.