गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावात नोटाचीच धूम
By Admin | Updated: October 22, 2014 23:17 IST2014-10-22T23:17:55+5:302014-10-22T23:17:55+5:30
विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घेण्यात आलेल्या मतदानात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा टक्का वाढला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानासह १७ हजार ५१० मतदारांनी

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावात नोटाचीच धूम
गोपाल लाजुरकर - गडचिरोली
विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घेण्यात आलेल्या मतदानात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा टक्का वाढला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानासह १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. गडचिरोली शहरातील ४२ बुथवर ५ हजार १०० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. काही गावात निवडणुकीवरील बहिष्कारामुळे अत्यल्प मतदान झाले. परंतु गडचिरोली विधानसभा क्षेत्रात नोटा तीसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पक्षीय मतदानापेक्षा नोटाचीच धूम सर्वाधिक होती.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १ लाख ६२ हजार ४९४ मतदारांनी मतदान केले. यात १ हजार १२३ पोस्टल मतदारांचा समावेश होता. पोस्टल मतदानासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. गडचिरोली शहरातील ४२ मतदान केंद्रावर ५ हजार १०० मतदारांनी नोटाचा वापर केला. धानोरा येथील ४ मतदान केंद्रावर ६८९ मतदारांनी नोटाचा वापर केला. चामोर्शी शहरातील ११ मतदान केंद्रावर ३६७ जणांनी नोटा वापरला. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या कुनघाडा रै. गावात ५ मतदान बुथ केंद्रावर ४१ जणांनी नोटाचा वापर केला. आष्टीतील ४ मतदान केंद्रावर ७४, घोट येथील ३ मतदान केंद्रावर २२१ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. पोर्ला येथील ३ मतदान केंद्रावर २६५, गोगाव येथील २ मतदान केंद्रावर १५६, राजघाटा चक येथील २ मतदान केंद्रावर २३५, काटली येथील २ मतदान केंद्रावर १८८ तर अडपल्ली येथील एका मतदान केंद्रावर २११ जणांनी नोटाचा वापर केला.
शहरानजिक असलेल्या नवेगाव येथील ५ मतदान केंद्रावर ५६३ जणांनी नोटाचा वापर केला तर कोटगल येथील ३ मतदान केंद्रावर २१२ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. धानोरा तालुक्यातील मोहली येथे १४०, सालेभट्टी येथे १०९, राजोली येथे १७२, दुधमाळा ६३, कटेझरी येथे ४८, चातगाव येथे ६६ जणांनी नोटाचा वापर केला. चामोर्शी तालुक्यातील आमगाम महाल येथील २ मतदान केंद्रावर अनुक्रम १२७, १२१, हिवरगाव येथे १४०, अनंतपूर ६३, पावीमुरांडा येथे ३०, भाडभिडी ७० जणांनी नोटाला पसंती दर्शविली. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे काही गावात अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे एकुण मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. क्षेत्राच्या ग्रामीण भागातही नोटाचा वापर झाला.