चायना नव्हे, ‘दिल्ली मेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:29+5:30

चीनी वस्तूंप्रमाणे स्वस्त आणि मस्त वस्तू बनविण्याचे कौशल्य भारतीय कंपन्यांनीही आत्मसात केल्याने मागील दोन वर्षांपासून चायना मेड वस्तूंना भारतीय कंपन्यांकडून टक्कर देण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी तर गडचिरोली बाजारपेठेतील बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया’ लिहिलेल्या दिल्ली बाजारपेठेतील आहेत.

Not China, 'Delhi Made' | चायना नव्हे, ‘दिल्ली मेड’

चायना नव्हे, ‘दिल्ली मेड’

Next
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम नाही । होळी-रंगोत्सवासाठी सजली गडचिरोलीची बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हुबेहुब चायना मेड वस्तूप्रमाणे दिसणाऱ्या आणि तेवढ्याच स्वस्त वस्तू आता भारतीय कंपन्यांनीही बाजारात आणल्यामुळे होळी आणि रंगोत्सवात आता ‘कोरोना’ग्रस्त चायना मेड नाही तर दिल्ली मेड वस्तूंची रेलचेल राहणार आहे. त्यामुळे रविवारी होळीच्या खरेदीला उधाण येणार आहे.
चीनी वस्तूंप्रमाणे स्वस्त आणि मस्त वस्तू बनविण्याचे कौशल्य भारतीय कंपन्यांनीही आत्मसात केल्याने मागील दोन वर्षांपासून चायना मेड वस्तूंना भारतीय कंपन्यांकडून टक्कर देण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी तर गडचिरोली बाजारपेठेतील बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया’ लिहिलेल्या दिल्ली बाजारपेठेतील आहेत. त्यामुळे होळी खेळण्यासाठी गडचिरोलीकरांना कोरोनाची अजिबात भिती बाळगण्याची गरज नसल्याचे दिसून येत आहे.
चायनाच्या वस्तू ‘स्वस्तात मस्त’ राहात असल्याने सदर वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक राहात होता. त्या तुलनेत भारतीय कंपन्यांनी बनविलेल्या वस्तू टिकाऊ असल्या तरी त्या तुलनेने महाग असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करत नव्हत्या. त्यामुळे स्वदेशीचा कितीही जागर करण्यात आला तरी बाजारपेठेत गेलेला ग्राहक ‘मेड इन चायना’चीच वस्तू खरेदी करीत होता. मात्र यावर दोन वर्षांपासून भारतीय कंपन्यांनी मात केली आहे.
चायनाच्या वस्तूप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करतील अशा वस्तू बनविल्या जात आहेत. यामध्ये धुलिवंदनासाठी वापरल्या जाणाºया वस्तूंचा समावेश आहे. मंगळवारी धुलिवंदन आहे. त्यामुळे शनिवारीच गडचिरोली शहरातील बाजारपेठ सजली आहे. या बाजारपेठेत ९० टक्के वस्तू मेड इन इंडियाच्या आहेत. कोरोनाबाबत देशभरात भीती पसरली असली तरी गडचिरोली येथील बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसून आला नाही. रविवारी खरेदी आणखी जोरात सुरू राहील.

१० मिनिटात बर्फ तयार करणारे पावडर
दरवर्षी होळीच्या सणासाठी एखादी नवीन वस्तू बाजारपेठेत येते. सदर वस्तू बच्चेकंपनी व नागरिकांचे लक्ष वेधून घेते. यावर्षी दहा मिनिटात पाच लिटर पाण्याचे बर्फात रूपांतर करणारे पावडर बाजारपेठेत आले आहे. सदर पावडरची किंमत ५० रुपये आहे. जवळपास पाच लिटर पाणी बकेटमध्ये घेऊन त्यामध्ये बर्फ तयार करणारे पावडर टाकल्यास १० मिनिटात बर्फ तयार होते. सदर बर्फ एकमेकांवर फेकून बच्चे कंपनीला होळीचा आनंद लुटता येतो. वेगवेगळ्या रंगातील बर्फ तयार करता येतो हे विशेष. बाजारपेठेत वॉटर बलून, ड्रॅगन गण, पब्जी गण, वॉटर गण, पुंगी, नगारा, हर्बल कलर आदी वस्तूही बच्चे कंपनीचे लक्ष वेधणार आहे.

चार महिन्यांपूर्वीच माल होतो दाखल
बाजारपेठेत अजुनही काही वस्तू चीनच्या आहेत. मात्र चीनमध्ये तयार झालेल्या मालाची भारतातील मुख्य विक्रेते चार महिन्यांपूर्वीच खरेदी करतात. एक दिवसाचा सण असला तरी उत्पादन ते प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत माल पोहोचण्यास चार महिन्यांचा कालावधी लागते. म्हणजेच, सध्या बाजारपेठेत आलेला माल चार ते पाच महिन्यांपूर्वी उत्पादीत झाला आहे. चिनमध्ये कोरोना व्हायरसने एक महिन्यापासून कहर माजविला आहे. वेळेतील फरक लक्षात घेतला तर भारतीय नागरिकांना कोरोनाबाबत फारशी भीती बाळगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दुकानदार रियाज शेख यांनी दिली.

Web Title: Not China, 'Delhi Made'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.