ना शाळा, ना परीक्षा; तरीही पावणेदाेन लाख विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:45+5:302021-06-22T04:24:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना विषाणूने माणसाच्या जीवनपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ...

No school, no exams; Five lakh students still pass! | ना शाळा, ना परीक्षा; तरीही पावणेदाेन लाख विद्यार्थी पास!

ना शाळा, ना परीक्षा; तरीही पावणेदाेन लाख विद्यार्थी पास!

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : काेराेना विषाणूने माणसाच्या जीवनपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण हाेय. ऑनलाईन शिक्षणामुळे यावर्षी इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या. परिणामी गडचिराेली जिल्ह्यातील या बाराही वर्गातील एकूण १ लाख ८९ हजार ८७१ विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण झाले आहेत.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे अनेक फायदे असले, तरी ताेटे अधिक आहे. कारण गडचिराेली जिल्ह्याची भाैगाेलिक परिस्थिती व उपलब्ध साधनांची संख्या पाहता, प्रत्यक्ष शिक्षणातूनच विद्यार्थी आजपर्यंत घडले आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष वर्ग भरले नाही. परिणामी विद्यार्थी आळशी व बेशिस्त झाले. त्यांच्यातील क्रीडा, कला व इतर काैशल्याचा विकास झाला नाही. प्रत्यक्ष शाळेत जाऊन विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व व सर्वांगीण विकास हाेत असताे. मात्र वर्षभर शाळेत न गेल्याने अशाप्रकारचा विद्यार्थ्यांचा विकास खुंटला आहे. केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्याचे काम झाले.

बाॅक्स......

फायदे

- ऑनलाईन शिक्षणामुळे कॉम्प्युटर, लॅपटाॅप, पॅड, टॅबलेट, स्मार्ट फाेन, इंटरनेट व झूम ॲप आदी हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थांना अवगत झाले.

- सकाळी उठून मुलांना तयार करणे, त्यांच्यासाठी डबा बनविणे, शाळेवर वेळेवर साेडणे आदी कामे पालकांची टळली.

- तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थ्यांत ज्ञानाविषयी गाेडी निर्माण झाली.

ताेटे

- मुलांमध्ये आळस निर्माण हाेत असून, सकाळी उठण्याची सवय बंद झाली आहे.

- ऑनलाईन शिक्षणामुळे इंटरनेटचा गैरवापरदेखील विद्यार्थी करीत आहेत.

- ऑनलाईन गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे आदींमुळे आराेग्यावर दुष्परिणाम झाला आहे.

- डाेळ्यावर ताण पडत आहे. तसेच मानदुखी, पाठदुखी वाढत आहे.

शहरे

- ऑनलाईन शिक्षण शहरी भागात काही प्रमाणात प्रभावी ठरले.

- सामान्य व सुविधा नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.

- इंटरनेटची समस्या अडचणीची ठरली.

खेडेगाव

- ग्रामीण भागातील ८० टक्के पालकांकडे स्मार्ट फाेन नाही.

- इंटरनेट कनेक्टिव्हिटी व इतर सुविधांच्या अभावामुळे मुले शिक्षण घेेऊ शकली नाहीत.

Web Title: No school, no exams; Five lakh students still pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.