शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी नाही; ५० रुपयांसाठी भरला लाखो रुपयांचा दंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 17:46 IST

चालकांनो, खबरदार! : प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्त्यांवर वाहने चालविण्यासाठी, तसेच आपले वाहन प्रदूषण करीत तर नाही ना, हे दर्शविणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दुचाकीसह विविध प्रकारच्या वाहनधारकांना सोबत बाळगावे लागते. 

मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी (प्रदूषण नियंत्रण) प्रमाणपत्र अनिवार्य आहे, तरीही अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. ५० रुपयांत मिळणारे प्रमाणपत्र नसेल, तर त्या वाहनधारकांवर कारवाई होऊ शकते. जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत सव्वा लाखांवर अधिक रुपयांचा दंड वाहनधारकांनी पीयूसीअभावी भरला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून मोटार वाहन कायद्यानुसार जबर दंडाच्या तरतुदी केल्या जात आहेत. दुचाकी असो किंवा चारचाकी, सर्वच वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र सक्तीचे आहे. अन्यथा कारवाई केली जाते.

पीयूसी नसेल तर दंड किती?• दुचाकींसाठी दोन हजार : दुचाकी वाहनांसाठी ५० ते १०० रुपयांत पीसूसी प्रमाणपत्र घेता येते. जर वाहनधारकाकडे पीसूसी नसेल, तर त्याच्यावर दोन हजार रुपयांचा दंड बसतो. वाहतूक पोलिस किंवा आरटीओकडून हा दंड ठोठावला जाऊ शकतो.• चारचाकींसाठी चार हजार : चारचाकी वाहनासाठी १२५ रुपयांमध्ये पीयूसी चाचणी केली जाते. चारचाकी वाहनधारकांकडे पीयूसी नसेल, तर त्या वाहनधारकावर चार हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

सहा महिन्याला पीयूसीवाहन नवीन असेल, तर कंपनीमार्फत एक वर्षासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर, त्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारकांना दर सहा महिन्यांनी पीयूसी चाचणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.

ऐन वेळी काढली जाते पीयूसी• बंधनकारक असतानाही पीयूसी काढण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण मोठे आहे.• कारवाई सुरू झाल्यानंतरच त्या काळात पीयूसी काढली जाते, तसेच वाहनाचा विमा काढताना अथवा पुननोंदणी करताना पीयूसी काढली जाते.

पीयूसी नसल्यास विमा विसराएखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहन मालकाकडे वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. एवढे महत्त्वाचे दस्तावेज असतानाही त्याकडे दुर्लक्ष होते.

पीयूसी का महत्त्वाची?आपले वाहन प्रदूषण करते काय, ही बाब पीयूसी तपासणीत स्पष्ट होते. वाहन जर प्रदूषण करीत असेल, तर संबंधित वाहन मालकाला ते वाहन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो, यासाठी पीयूसी महत्त्वाची आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडीGadchiroliगडचिरोली