एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:31+5:30

या तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोवणीचे काम लांबणीवर पडले. परिणामी धानाची कापणी व बांधणीचे कामही पुढे सरकले. आता धानोरा तालुक्यात हलके, मध्यम व जड या तीनही प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून अनेक शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहेत.

No Paddy Shopping Center started | एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही

एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही

ठळक मुद्देधानोरा तालुक्यात अडचण वाढली : महामंडळ व आविका संस्थेत समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आविका संस्थेच्या वतीने दरवर्षी धानाची खरेदी केली जाते. यावर्षीही धानोरा तालुक्यात ८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र एकही केंद्र अद्याप सुरू न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
या तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोवणीचे काम लांबणीवर पडले. परिणामी धानाची कापणी व बांधणीचे कामही पुढे सरकले. आता धानोरा तालुक्यात हलके, मध्यम व जड या तीनही प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. हलक्या प्रतीच्या धानाची कापणी झाली असून अनेक शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर खरेदीचा शुभारंभ झाला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याला धान विकावे लागत आहेत.
शासनाने व प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन मंजूर केलेले तालुक्यातील धान खरेदी केंद्र लवकर सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानोरा तालुक्यात सोडे, रांगी, मोहली, धानोरा, दुधमाळा, मुरूमगाव, कारवाफा व पेंढरी अशा ८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र संस्थेच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले नाही. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्हा प्रशासन व महामंडळाच्या वतीने या आठ केंद्रांना आठ दिवसांपूर्वीच मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र आविका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ताठर भूमिका घेतली.
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धान खरेदी करणार नाही, असा इशारा संस्थांनी महामंडळाला दिला होता. त्यानंतर महामंडळ व शासनाच्या वतीने गतीने कार्यवाही करून संस्थांच्या काही मागण्या निकाली काढल्या आहेत.

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने संस्थेच्या सहकार्याविना केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. महामंडळ कार्यालयाने थकीत कमिशन व प्रतवारीकरांचे पैसे संस्थेच्या खात्यात वर्ग केले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यातील केंद्र सरू होतील. आतापर्यंत पर्यंत पाच केंद्रांवर बारदाना पोहोचविण्यात आला असून उर्वरित केंद्रावर गुरूवारला बारदाना पोहोचविण्यात येणार आहे.
- डी.एस.चौधरी, उपप्रादेशिक व्यवस्थापक,
आदिवासी विकास महामंडळ कार्यालय, धानोरा

दोन दिवसात येणार गती
गतवर्षीच्या हंगामातील खरेदी कामाच्या कमिशनची रक्कम संबंधित आविका संस्थेच्या खात्यात वळती करण्यात आली तसेच यावर्षी बारदानाही पुरविण्यात आला. शासन स्तरावरील मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्या असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आविका संस्थेकडून आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत खरेदी केंद्रांवर धान खरेदीला सुरूवात होणार आहे.

Web Title: No Paddy Shopping Center started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार