कर्मचारी नाही; कार्यालय ओस

By Admin | Updated: July 17, 2014 00:06 IST2014-07-17T00:06:31+5:302014-07-17T00:06:31+5:30

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय अहेरी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने या उपविभागाचा अतिरिक्त प्रभार एटापल्लीच्या सहाय्यक अभियंत्यांवर

No employee; Office dew | कर्मचारी नाही; कार्यालय ओस

कर्मचारी नाही; कार्यालय ओस

अहेरी : जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय अहेरी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने या उपविभागाचा अतिरिक्त प्रभार एटापल्लीच्या सहाय्यक अभियंत्यांवर देण्यात आला आहे. मात्र दोन महिन्यांपासून सहाय्यक अभियंत्यांचे पद रिक्त असतांनाही ते भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
अहेरी बांधकाम उपविभागातील सहाय्यक अभियंता दि. सु. तासाळकर यांची १ मे पूर्वी नाशिक येथील अभियांत्रिकी संशोधन संस्थेत बदली झाली. तेव्हापासून अहेरी बांधकाम उपविभागाचा अतिरिक्त पदभार एटापल्लीचे सहाय्यक अभियंता एस. व्ही. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. तेव्हापासून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही सहाय्यक अभियंत्यांचे पद अजूनपर्यंत भरण्यात आले नाही. एस. व्ही. पाटील यांच्याकडे अहेरी व्यतिरिक्त एटापल्लीच्या उपविभागांतर्गत भामरागडचेही अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार देण्यात आला आहे. दोन महिन्याचा कालावधी लोटूनही सहाय्यक अभियंत्याचे पद भरण्यात आले नाही. त्यामुळे कार्यालयीन कामात दिरंगाई निर्माण झाली आहे. बांधकाम उपविभागांतर्गत अनेक कामांचा ताण पाटील यांच्यावर आहे. तसेच त्यांच्यावर भामरागडचाही अतिरिक्त भार देण्यात आल्याने नवीन सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
अनेकदा नवीन अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मागणी करूनही रिक्त पद भरण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दोन उपविभागाचा भार पाटील यांना सांभाळावे लागत आहे. त्यामुळे अहेरी येथील सहाय्यक अभियंत्यांचे रिक्त पद त्वरित भरावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: No employee; Office dew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.