निर्मला मडके होणार गडचिरोलीच्या नव्या नगराध्यक्ष

By Admin | Updated: July 7, 2014 23:34 IST2014-07-07T23:34:01+5:302014-07-07T23:34:01+5:30

गडचिरोली नगर पालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून निर्मला भाऊसाहेब मडके यांची वर्णी लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे यांचा कार्यकाळ २७ जून रोजी संपुष्टात आला आहे.

Nirmala Madke will be the new city president of Gadchiroli | निर्मला मडके होणार गडचिरोलीच्या नव्या नगराध्यक्ष

निर्मला मडके होणार गडचिरोलीच्या नव्या नगराध्यक्ष

एकच नामनिर्देशनपत्र दाखल : १४ जुलैला होणार विराजमान
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून निर्मला भाऊसाहेब मडके यांची वर्णी लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे यांचा कार्यकाळ २७ जून रोजी संपुष्टात आला आहे. आगामी १४ जुलैला पुढील अडीच वर्षासाठी नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आज सोमवारी निर्मला भाऊसाहेब मडके यांचे नामनिर्देशनपत्र सत्ताधारी युवाशक्ती आघाडीच्यावतीने दाखल करण्यात आले.
२३ सदस्यीय गडचिरोली नगर पालिकेत युवाशक्ती आघाडीचे १३ नगरसेवक आहे व इतर कुणीही नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले नसल्याने मडके यांची अविरोध होण्याची शक्यता आहे. आज मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.
यावेळी गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, नगराध्यक्ष भुपेश कुळमेथे, पाणी पुरवठा सभापती संजय मेश्राम, शिक्षण सभापती सचिन बोबाटे, नगरसेवक नितीन कामडी, भाऊसाहेब मडके, नगरसेविका सुषमा राऊत, शारदा दामले, भांडेकर, महेश राऊत, तेजसींग बजाज, राजू कुकुडकर, माजीद सय्यद, हेमंत शेंडे, दिनेश मेश्राम, अनुराग कुडकावार, मंगेश सिडाम, नितीन जेंगठे, किशोर ठाकूर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Nirmala Madke will be the new city president of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.