स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये निराेप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:43 IST2021-02-20T05:43:12+5:302021-02-20T05:43:12+5:30
गडचिरोली : स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निराेप देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. अविनाश गाैरकार, स्कूल ...

स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये निराेप समारंभ
गडचिरोली : स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निराेप देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. अविनाश गाैरकार, स्कूल ऑफ स्काॅलर्सचे संचालक विनाेद पिल्लयी, प्राचार्य गणेश पारधी उपस्थित हाेते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमधून ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून आर्या काेमटवार, ‘बेस्ट स्पाेर्ट स्टुडंट’ म्हणून हर्ष भैर, ‘बेस्ट सिंगर’ ब्राेन खेडकर, ‘बेस्ट आर्टिस्ट’ म्हणून आदित्य नैताम यांना गाैरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियाेजन करून अभ्यासात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन विनाेद पिल्लयी यांनी केले. डाॅ. गाैरकार, प्राचार्य गणेश पारधी यांनीही मार्गदर्शन केले; तर शिक्षक अमरिश उराडे, विद्यार्थिनी वेदिका मंगळगिरी, चारू राठी, आदित्य कुनघाडकर यांनी मनाेगत व्यक्त केले. आदित्य नैताम, श्रावस्ती रामटेके, आर्या आखाडे यांनी गीतगायन केले. संचालन अविलाषा चाैधरी, तपाेती गयाली तर आभार शैलेश आकरे यांनी मानले.