शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार मेट्रिक टन खत साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:33 IST

जिल्हाभरातील ५०० खते विक्रेत्यांकडे सुमारे ८ हजार ८६४ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खताचा साठा आहे.

ठळक मुद्देयुरियाही पुरेसा : रोवणीला सुरू होताच खतांची मागणी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील ५०० खते विक्रेत्यांकडे सुमारे ८ हजार ८६४ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खताचा साठा आहे.पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना सुरुवात होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानाची रोवणी केली जाते. सुमारे दीड लाख हेक्टरवर धानपिकाची रोवणी होते. रोवणीच्या कालावधीतच शेतकरी धानपिकाला खत देत असल्याने या कालावधीत खताची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत प्रत्येक खत विक्रेत्याकडे पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकºयांची लूट होण्याची शक्यता निर्माण होते. याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला असल्याने रोवण्याच्या सुरुवातीलाच कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून दिले आहे. मागील हंगामातील ६ हजार ४०० मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यानंतर आणखी जवळपास २ हजार ४०० मेट्रिक टन खत यावर्षीच्या पावसाळ्यात मागविण्यात आले आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सद्य:स्थितीत २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खत, ११८ मेट्रिक टन एमपीओ खत, ५६३ मेट्रिक टन डीएपी, १ हजार १२४ मेट्रिक टन एसएसपी, १ हजार २१० मेट्रिक टन संयुक्त खते, २ हजार ९८८ मेट्रिक टन मिश्रखते उपलब्ध आहेत.धानपिकाच्या रोवणीला सुरुवात झाली आहे. रोवणीदरम्यान बहुतांश शेतकरी डीएपी, संयुक्त खते व मिश्रखतांचा वापर करतात. त्यामुळे हे खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. युरिया खताचा वापर धानपीक गर्भाशयात असताना केला जातो. युरिया खताची मागणी एकदम वाढत होती. त्याचबरोबर युरिया खताचा खत कंपन्या काळाबाजार करीत असल्याने या खताची टंचाई निर्माण होत होती.मात्र मागील वर्षीपासूून युरिया खताला निमकोट लावण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. तेव्हापासून युरिया खताचा काळाबाजार कमी झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून युरिया खताचीही टंचाई जाणवत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.पॉस मशीनद्वारे अजूनही खतविक्री नाहीकृषी विभागाने जिल्हाभरातील खत विक्रेत्यांना पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहेत. या पॉस मशीनच्या सहाय्यानेच खताची विक्री करायची आहे. अनेकांनी या मशीन सुरू केल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष खतविक्री या मशीनच्या सहाय्याने होत नसल्याचे दिसून येत आहे. या मशीनमधूनच बिलाची सत्यप्रत निघत असल्याने अधिकची किंमत खत विक्रेते आकारू शकत नाही. त्यामुळे अनेक खत विक्रेते या मशीनच्या सहाय्याने खत विक्री करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित खत विक्रेत्यांना तंबी देऊन पीओएस मशीनच्या सहाय्यानेच खत विक्री करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.