नागाच्या पोटातून निघाली कोंबडीची नऊ अंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:02 IST2018-07-05T00:00:58+5:302018-07-05T00:02:21+5:30

दोन कोंबड्या ठार करीत एका नागाने त्यांची नऊ अंडी गिळली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या या नागाच्या पोटातून सर्व अंडी जशीच्या तशी बाहेर काढत, सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे.

 Nine eggs, chicken out of the stomach! | नागाच्या पोटातून निघाली कोंबडीची नऊ अंडी!

नागाच्या पोटातून निघाली कोंबडीची नऊ अंडी!

चंद्रपूर : दोन कोंबड्या ठार करीत एका नागाने त्यांची नऊ अंडी गिळली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या या नागाच्या पोटातून सर्व अंडी जशीच्या तशी बाहेर काढत, सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे. मूल तालुक्यातील मरेगाव येथे बुधवारी सकाळी ही आश्चर्यकारक घटना घडली. या नागाला जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले आहे.
मूल-नागपूर मार्गावरील मरेगाव येथील श्यामराव चुधरी यांच्या घरातील दोन कोंबड्या अंडी उबवण्यासाठी बसलेल्या होत्या. या कोंबड्यांना दंश करीत नागाने त्यांची नऊ अंडी गिळल्याचे त्याच्या पोटाच्या वाढलेल्या आकारावरून चुधरी यांच्या लक्षात आले. मृत कोंबड्यांशेजारीच अत्यवस्थ नाग पडलेला होता.

Web Title:  Nine eggs, chicken out of the stomach!