शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अवजारांसाठी नऊ कोटींचा निधी

By admin | Updated: August 17, 2016 01:39 IST

शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांची तरतूद केली

कृषीपयोगी साहित्य : शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू गडचिरोली : शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांची तरतूद केली असून यासाठी अर्ज मागविण्याचे काम सुरू झाले आहे. शेती कसण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य महाग असल्याने प्रत्येकच शेतकरी सदर साहित्य खरेदी करू शकत नाही. शेतीमध्ये अवजारांचा वापर न झाल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता राहत असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे वितरित केली जातात. आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने ८ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता लाभार्थी निवडीचे काम सुरू झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वाधिक निधीची तरतूद केली आहे. शासकीय दप्तरी असलेल्या नोंदीनुसार गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या ४ लाख १५ हजार ३०६ एवढी आहे. या आदिवासी शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करताना मदत व्हावी, यासाठी ५ कोटी ७५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यासाठी ३७ लाख, आरमोरी ३० लाख ३२ हजार, देसाईगंज ९ लाख ४४ हजार, कुरखेडा ६१ लाख ४१ हजार, कोरची तालुक्यासाठी ४१ लाख ९ हजार, धानोरा ७७ लाख ४ हजार, चामोर्शी ४२ लाख ७८ हजार, एटापल्ली १ कोटी ११ लाख ७६ हजार, भामरागड ४९ लाख ४४ हजार, सिरोंचा २२ लाख ६७ हजार, मुलचेरा १८ लाख ७७ हजार, अहेरी ७३ लाख ६९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी ६६ लाख रूपये मंजूर आहेत. (नगर प्रतिनिधी)