नऊ कंत्राटी चालक एसटीत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:30+5:30
एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ कंत्राटी चालक गडचिराेली आगारात रुजू झाले आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. वाहकांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियंत्रकांना स्पाॅट बुकिंग करण्याचे काम साेपविण्यात आले आहेत.

नऊ कंत्राटी चालक एसटीत रुजू
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली बस आगारात नऊ कंत्राटी चालक, आंदाेलकांपैकी एक वाहक रुजू झाला आहे. त्यामुळे आता गडचिराेली आगारातील चालकांची संख्या १५ झाली आहे. दर दिवशी वेगवेगळ्या मार्गांवर १५ बसेस साेडल्या जात आहेत.
एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ कंत्राटी चालक गडचिराेली आगारात रुजू झाले आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे.
वाहकांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियंत्रकांना स्पाॅट बुकिंग करण्याचे काम साेपविण्यात आले आहेत. चंद्रपूर मार्गावरील काॅम्प्लेक्स, लहान व्याहाड, माेठा व्याहाड, सावली येथे गडचिराेली आगाराचे वाहतूक नियंत्रक स्पाॅट बुकिंग करीत आहेत, तर मूल येथे चंद्रपूर विभागाचे वाहतूक नियंत्रक स्पाॅट बुकिंग करीत आहेत. चंद्रपूरसाठी दरदिवशी सात बसेस साेडल्या जात आहेत.
तीन महिन्यांनंतर नागपूरला पाेहाेचली बस
- एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूरसाठी गडचिराेली आगारातून बसफेरी साेडण्यात आली. प्रत्येक दिवशी सकाळी ७.३० व सकाळी ९ वाजता गडचिराेली आगारातून बस साेडली जाणार आहे. यापूर्वी काही नागपूर आगाराच्या बसेस गडचिराेलीला येत हाेत्या.
गडचिराेली आगारातून चंद्रपूरसाठी ७, देसाईगंज २, नागपूर २, अहेरी १ व आष्टीसाठी २ बसेस साेडल्या जात आहेत. बसफेऱ्यांची एकूण संख्या ४४ पर्यंत पाेहाेचली आहे.