सोनसरीत नीलगायीची शिकार
By Admin | Updated: August 19, 2016 00:50 IST2016-08-19T00:50:18+5:302016-08-19T00:50:18+5:30
तालुक्यातील सोनसरी येथील तलावात नीलगायीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून शिकार केल्याची घटना १७ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

सोनसरीत नीलगायीची शिकार
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी येथील तलावात नीलगायीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून शिकार केल्याची घटना १७ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ओमेश मारोती राऊत (४५), सुभाष बिरसिंग कवडो (२२) दोघेही रा. सोनसरी असे आरोपींची नावे आहेत. सोनसरी येथील गावतलावात पाणी पिण्यासाठी आलेल्या नीलगायीला पकडण्यासाठी आरोंनी सापळा रचला होता. पाणी पिण्यासाठी नीलगाय आल्यानंतर सापळ्यात पकडून तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. कुऱ्हाडीच्या वाराने नीलगाय जागीच ठार झाली. ही बाब गावकऱ्यांना माहित होताच गावकऱ्यांनी याबाबतची माहिती देलनवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपींना मुद्देमालासह अटक केली. देसाईगंज येथील न्यायालयात १८ आॅगस्ट रोजी हजर केले असता, आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास एसीएफ कांबळे, वनपरिक्षेत्राधिकारी साळवे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहायक शेंडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)