दुसऱ्या दिवशीही हातभट्ट्यांवर धाडसत्र

By Admin | Updated: September 18, 2014 23:36 IST2014-09-18T23:36:15+5:302014-09-18T23:36:15+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूभट्ट्यांवर सुरू केलेल्या धाडसत्रात दुसऱ्या दिवशीही दोन भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गोंदियाच्या पथकाने यशस्वी केली.

In the next day, there was a raid on the assassins | दुसऱ्या दिवशीही हातभट्ट्यांवर धाडसत्र

दुसऱ्या दिवशीही हातभट्ट्यांवर धाडसत्र

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूभट्ट्यांवर सुरू केलेल्या धाडसत्रात दुसऱ्या दिवशीही दोन भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. ही कारवाई गोंदियाच्या पथकाने यशस्वी केली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसऱ्या भट्टीचा चालक पसार झाला.
निवडणुकीदरम्यान अवैधपणे मद्यवाटप करण्यासाठी तसेच प्रचाराच्या कामात येणाऱ्या लोकांसाठी मद्याची व्यवस्था अनेक उमेदवार करीत असतात. याला आळा घालून निकोप वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात बुधवारपासून धाडसत्र सुरू करण्यात आले. बुधवारी जिल्ह्यातील विविध निरीक्षकांच्या पथकांसह भरारी पथकांनी भाग घेऊन ८ हातभट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. गुरूवारी गोंदियाचे निरीक्षक सुरेश डोंगरे यांच्यासह त्यांचे सहकारी छगन हुमे, राजेश ढाले, सुनील ढोमणे, वाहनचालक सोनबरसे यांनी ओजीटोला शिवाराच्या नाल्याच्या काठाने लावलेल्या दोन भट्ट्या पकडल्या. यावेळी दुर्गाप्रसाद राधेलाल लांजेवार (रा.चुटीया) याला अटक करण्यात आली तर नरवीर हरिलाल उईके (रा.ओजीटोला) हा फरार झाला.
गुरूवारच्या कारवाईत ५८ लिटर मोहा दारू आणि ८०० लिटर मोहा सडवा असा एकूण २३ हजार ४२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Web Title: In the next day, there was a raid on the assassins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.