आमदारांकडुन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:38 IST2021-02-24T04:38:05+5:302021-02-24T04:38:05+5:30
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभचे ...

आमदारांकडुन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभचे आयोजन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस एटापल्लीच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी धर्मरावबाबा आत्राम होते. प्रमुख अतिथी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री हलगेकर , प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर , तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर यांची होती।
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली।
प्रसंगी बोलताना धर्मराव बाबा म्हणाले की, ग्राम पंचायत निवडणुकीत एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षला अभुतपुर्व यश मिळाले. याचे श्रेय कार्यकर्ते वर्गास जाते. मेहनतीने मिळालेले यश दीर्घकाळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यश दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पक्ष गाव पातळीवर मजबूत करणे आवश्यक आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी समन्वय ठेवावा. पक्षाची ध्येय,धोरण सर्वसामान्य माणसाला समजून सांगावी व पक्ष मजबूत करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.।संचालन बेबी लेकामी तर आभार लक्षमन नरोटे यांनी मानले.