नवनिर्वाचित नगरसेवकांची वीज कार्यालयावर धडक

By Admin | Updated: November 18, 2015 01:28 IST2015-11-18T01:28:38+5:302015-11-18T01:28:38+5:30

भारतीय जनता पार्टीतर्फे अहेरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नऊही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंगळवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ...

The newly-elected corporators hit the power office | नवनिर्वाचित नगरसेवकांची वीज कार्यालयावर धडक

नवनिर्वाचित नगरसेवकांची वीज कार्यालयावर धडक

निवेदन दिले : लोकसेवेचा केला प्रारंभ
अहेरी : भारतीय जनता पार्टीतर्फे अहेरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नऊही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंगळवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या वीज समस्या सोडविण्याची मागणी केली.
अहेरी शहरात व संपूर्ण तालुक्यात महावितरणच्या वतीने ग्राहकांना वीज देयके उशिरा दिल्या जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर विलंब शुल्काचा विनाकारण बोजा बसत आहे. उशिरा वीज देयके प्राप्त होत असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. महावितरण कंपनी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना भेडसावत आहे. महावितरण कार्यालयाने आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करून विहित कालावधीत वीज ग्राहकांना योग्य वीज देयके पाठवावीत. तसेच अतिरिक्त वीज बिल कमी करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली. महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल पिंपळे यांनी निवेदन स्वीकारून वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रेखा सडमेक, हर्षा ठाकरे, स्मिता येमुलवार, अन्नपूर्णा सिडाम, कमल पडगेलवार, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम तसेच भाजपाचे अहेरी तालुकाध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, रमेश समुद्रालवार, शंकर मगडीवार, दिनेश येनगंटीवार, संतोष येमुलवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल पिंपळे यांच्याशी वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत चर्चा केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The newly-elected corporators hit the power office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.