डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 1, 2015 01:53 IST2015-07-01T01:53:59+5:302015-07-01T01:53:59+5:30
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा नवजात बालक दगावला, ...

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयातील प्रकार : पोलीस ठाणे, एसपीकडे तक्रार
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती कक्षातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ३ किलो २२० ग्रॅम वजनाचा नवजात बालक दगावला, यासंदर्भात प्रसूत महिलेचे पती दिनेश मंडल व नातेवाईकांनी गडचिरोली पोलीस ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून येथील दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय मानवाधिकार परिषद गडचिरोलीचे विभागीय अध्यक्ष गजेंद्र डोमळे, महिलेचे पती दिनेश मंडल व महिलेच्या नातेवाईकांनी केली.
यावेळी माहिती देताना पती दिनेश मंडल, प्रसूत महिलेचा भाऊ असिम समजदार, वहिणी शोभा समजदार यांनी सांगितले की, चामोर्शी तालुक्यातील रवींद्रपूर येथील शांती दिनेश मंडल (३०) या गरोदर मातेला ३० जून २०१५ रोजी प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ७ जूनला प्रसुती न करता शांती मंडल हिला सुटी देण्यात आली. १५ दिवसानंतर प्रसुतीकरिता सदर महिलेला आणण्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर २४ जून रोजी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्रॉफी काढण्यात आली. मात्र येथील डॉक्टरांनी सदर महिलेची वेळेवर प्रसुती केली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजता नवजात बालकाचा गुदमरून गर्भातच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता प्रसुती तज्ज्ञ डॉ. किलनाके यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मृतावस्थेतच बालक गर्भाशयातून बाहेर काढण्यात आला, असेही दिनेश मंडल यांनी सांगितले. याप्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.