नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यावर विचारमंथन
By Admin | Updated: September 4, 2015 01:21 IST2015-09-04T01:21:25+5:302015-09-04T01:21:25+5:30
रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०११ यावर विचारमंथन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक गोंडवाना विद्यापीठात सोमवारी करण्यात आले.

नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यावर विचारमंथन
गोंडवाना विद्यापीठ : शासनाकडे पाठविणार कार्यशाळेचा अहवाल
गडचिरोली : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०११ यावर विचारमंथन करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्थानिक गोंडवाना विद्यापीठात सोमवारी करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. चांदेकर यांच्या बिज भाषणाने कार्यशाळेची सुरुवात झाली. वैचारिक व मानसिक दृष्टीने भविष्यकाळात कायद्यासंबंधी विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. दिनेश सूर्यवंशी यांनी प्रस्तावित विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाची प्राधिकरणे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाचे अधिकारी प्राचार्य डॉ. राजू मुनघाटे यांनी विद्यापीठाच्या विविध समित्या याबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रात डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. बारसागडे, डॉ. अंजली हस्तक, डॉ. विवेक जोशी, डॉ. मनोरंजन मंडल, डॉ. मिलींद देशपांडे यांनी सहभाग घेऊन कायद्यात काही सुधारणा करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
कार्यशाळेचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. कार्यशाळेला विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे आजी-माजी अधिष्ठाता, सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. श्रीराम रोकडे यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर, डॉ. रशमी बंड, डॉ. श्रीराम गहाणे, डॉ. मिलींद देशपांडे तर आभार कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)