कोरोनाबाधितांचा नवीन विक्रम, २४ तासांत ६१५ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:37 IST2021-04-21T04:37:01+5:302021-04-21T04:37:01+5:30
आतापर्यंत जिल्ह्यात १५९२९ जण कोरोनाबाधित, तर १२२४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३४४७ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ...

कोरोनाबाधितांचा नवीन विक्रम, २४ तासांत ६१५ नवीन रुग्ण
आतापर्यंत जिल्ह्यात १५९२९ जण कोरोनाबाधित, तर १२२४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३४४७ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत एकूण २४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १५ नवीन मृत्यूमध्ये ५५ वर्षीय पुरुष अहेरी, ६५ वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, ७२ वर्षीय पुरुष माडगाव (ता. लाखांदूर जि. भंडारा), ८२ वर्षीय पुरुष चामोर्शी, ४४ वर्षीय महिला आरमोरी, ५२ वर्षीय पुरुष गडचिरोली, ४५ वर्षीय पुरुष माडेतुकूम गडचिरोली, ७० वर्षीय पुरुष घोट, (ता.चामोर्शी), ६९ वर्षीय पुरुष चामोर्शी, ५३ वर्षीय पुरुष उमरेड, जि. नागपूर, ४९ वर्षीय पुरुष गडचिरोली, ५२ वर्षीय पुरुष आरमोरी, ७१ वर्षीय पुरुष अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया, ६० वर्षीय महिला गडचिरोली, ४५ वर्षीय पुरुष नागपूर यांचा समावेश आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.८५ टक्के, तर मृत्यूदर १.५१ टक्के झाला आहे.
नवीन ६१५ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १८५, अहेरी तालुक्यातील ४६, आरमोरी ४०, भामरागड तालुक्यातील ३०, चामोर्शी तालुक्यातील ६४, धानोरा तालुक्यातील २८, एटापल्ली तालुक्यातील ५०, कोरची तालुक्यातील ३०, कुरखेडा तालुक्यातील ३४, मुलचेरा तालुक्यातील ४२, सिरोंचा तालुक्यातील ६, तर देसाईगंज तालुक्यातील ६० जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २८७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १०९, अहेरी ४०, आरमोरी १९, भामरागड १२, चामोर्शी १७, धानोरा १४, एटापल्ली ६, मुलचेरा ७, सिरोंचा ३, कोरची २८, कुरखेडा १५ तसेच देसाईगंज येथील १७ जणांचा समावेश आहे.