नेटवर्कअभावी बँक व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:14 IST2018-02-14T01:09:54+5:302018-02-14T01:14:52+5:30

सिरोंचा तालुक्यातील इंटरनेट सेवा सोमवारी ठप्प असल्याने बँक व्यवहार पूर्णपणे बंद होते. याचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसला. अधूनमधून इंटरनेट सेवा बंद पडत राहत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

Network failure junked the bank | नेटवर्कअभावी बँक व्यवहार ठप्प

नेटवर्कअभावी बँक व्यवहार ठप्प

ठळक मुद्दे बँक व कार्यालयांना फटका : सिरोंचातील सेवा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील इंटरनेट सेवा सोमवारी ठप्प असल्याने बँक व्यवहार पूर्णपणे बंद होते. याचा फटका शासकीय कार्यालयांनाही बसला. अधूनमधून इंटरनेट सेवा बंद पडत राहत असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.
सोमवारी सिरोंचा येथील आठवडी बाजार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी बँकांमधून पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र सकाळपासूनच इंटरनेट बंद असल्याने नेटवर्क नाही, लिंक फेल असे बोर्ड बँकांच्या प्रशासनाने दरवाजासमोर लावले होते. काही वेळाने इंटरनेट सेवा सुरू होईल, या अपेक्षेणे नागरिक बँकेसमोर बसले होते. मात्र सायंकाळपर्यंत इंटरनेट सेवा सुरू झाली नाही. परिणामी दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. पैसे नसल्याने बाजार करण्याचीही अडचण झाली.
सिरोंचा तालुकास्थळ असूनही वेळोवेळी दूरसंचार सेवा ठप्प पडते. याबाबतचे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी गंभीरतेने घेत नाही. सिरोंचासह संपूर्ण तालुकाच नेटवर्कच्या समस्येने ग्रस्त झाला आहे. जागोजागी टॉवर लावण्यात आले आहेत. या टॉवरवर थ्री-जी यंत्रणा बसविल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र साधा फोनही लागत नाही. त्यामुळे थ्री-जी यंत्रणा गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळावेळी इंटरनेट सेवा ठप्प पडत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Web Title: Network failure junked the bank