आॅनलाईन प्रशिक्षणात नेट कनेक्टीव्हिटीचा अडसर
By Admin | Updated: April 30, 2015 01:38 IST2015-04-30T01:38:20+5:302015-04-30T01:38:20+5:30
इयत्ता पाचवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रशिक्षणात सतत नेट कनेक्टीव्हिटीमुळे व्यत्यय येत आहे़ ,....

आॅनलाईन प्रशिक्षणात नेट कनेक्टीव्हिटीचा अडसर
देसाईगंज : इयत्ता पाचवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रशिक्षणात सतत नेट कनेक्टीव्हिटीमुळे व्यत्यय येत आहे़ तालुक्यात सुरू असलेल्या आॅनलाईन प्रशिक्षणापेक्षा परंपरागत पध्दतीने होणारे प्रशिक्षणच अतिशय प्रभावी ठरणार असल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. देसाईगंज शहरात सुरू असलेले आॅनलाईन प्रशिक्षण एकही दिवस पूर्णवेळ आॅनलाईन पध्दतीने सुरू राहिले नाही़ मग अशा पध्दतीच्या प्रशिक्षणाची गरज काय, असा सवाल प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी उपस्थित केला आहे़
शिक्षण विभागाने इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात फेरबदल केला आहे़ सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रापासून या नविन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे़ त्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षकांना आॅनलाईन पध्दतीने प्रशिक्षण दिले जात आहे़ २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान सकाळी १० ते ५ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ७०० केंद्रावरून इयत्ता पाचवीच्या शिक्षकांना पुणे येथून आॅनलाईन प्रशिक्षण देण्याची सोय शासनाने केली आहे़ दररोज एका विषयाचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाते़ तालुक्यातील प्रशिक्षण अगदी वेळेवर सुरू होते़ मात्र बीएसएनएलच्या ब्रॉडबँड सेवेच्या मंदगतीमुळे आॅनलाईन प्रशिक्षणात वारंवार व्यत्यय येत आहे़ २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या प्रशिक्षणात एक तासाचेदेखील निरंतर प्रशिक्षण शिक्षकांना मिळालेले नाही़ सततच्या व्यत्ययामूळे शिक्षकवर्ग त्रस्त झाला आहे़ (वार्ताहर)