व्याघ्रदर्शन : आरमोरी तालुक्यातील कासवी ते उसेगाव जगंल परिसरातील इटियाडोह कॅनलजवळ गुरूवारला सायंकाळच्या सुमारास अनेक लोकांनी नरभक्षक वाघ पाहिला. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली व सबंधित वनकर्मचाऱ्यांना वाघावर पाळत ठेवून वाघाचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वी याच भागात वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}