काेराेना लसीसाठी माेठी सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST2021-09-13T05:00:00+5:302021-09-13T05:00:39+5:30

धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ  सिरींजमुळे  लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक नागरिकाला ०.५ मिलीलीटर एवढा काेराेना लसचा डाेज दिला जाते. त्यामुळे  तेवढ्याच  क्षमतेची सिरींज वापरली जात हाेती. आता मात्र १ मिलीलीटर क्षमता असलेली सिरींज वापरली जात आहे. 

Needle needle for carina vaccine | काेराेना लसीसाठी माेठी सुई

काेराेना लसीसाठी माेठी सुई

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा डाेज व सुईचा (सिरींज) पुरवठा केंद्र शासनाकडून केला जाते. मागील काही दिवसांपासून सिरींजचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे नियाेजीत सिरींजपेक्षा अधिक क्षमतेची सिरींज वापरून काम चालवावे लागत आहे. 
काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासानाने उचलली आहे. त्यामुळे डाेज व सुईचा पुरवठा केंद्र शासनाकडून केला जात आहे. धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. 
केवळ  सिरींजमुळे  लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक नागरिकाला ०.५ मिलीलीटर एवढा काेराेना लसचा डाेज दिला जाते. त्यामुळे  तेवढ्याच  क्षमतेची सिरींज वापरली जात हाेती. आता मात्र १ मिलीलीटर क्षमता असलेली सिरींज वापरली जात आहे. 

दर दिवशी १० हजार सिरींजची गरज
राेवणीची कामे आटाेपल्याने आता लसीकरणाची गती वाढली आहे. दर दिवशी जवळपास ८ ते ९ हजार नागरिकांना लस दिल्या जात आहेत. काही सिरींज वेस्टेज गेल्या तरी जवळपास १० हजार सिरींजची गरज पडणार आहे. 

काय आहे एडी सिरींज
काेराेना लस देण्यासाठी एडी ही सिरींज पावरली जात आहे. एडी म्हणजेच ऑटाे डिस्पाेजल हाेय. या सिरींजचा पुन्हा पावर करणे शक्य हाेत नाही. तसेच लस वेस्टेज हाेण्याचे प्रमाणही कमी राहते.

केंद्र शासनाने दिली हाेती पूर्वसूचना

केंद्र शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या सिरींजचा तुटवडा निर्माण हाेऊ शकताे त्यामुळे पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, अशी सूचना केंद्र शासनाने देऊन ठेवली हाेती. त्यानुसार आराेग्य विभागाने पर्यायी सिरींज उपलब्ध करून दिल्याने लसीकरणाचे काम नियमित सुरू आहे. 

- आराेग्य विभागाने केलेल्या जनजागृतीनंतर काेराेना लसविषयी नागरिकांमध्ये असलेली भिती कमी झाली. त्यामुळे नागरिक लस घेण्यास तयार झाले. मात्र शेतीची कामे असल्याने लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आता शेतीची कामे आटाेपत आल्याने लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे.

 

Web Title: Needle needle for carina vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.