हक्क व अधिकारासाठी ऐक्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:01+5:302021-06-21T04:24:01+5:30
आरक्षण हक्क व कृती समिती जिल्हा गडचिरोलीद्वारे सविधान सभागृह, बळीराजा पॅलेस येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. ...

हक्क व अधिकारासाठी ऐक्याची गरज
आरक्षण हक्क व कृती समिती जिल्हा गडचिरोलीद्वारे सविधान सभागृह, बळीराजा पॅलेस येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सध्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब करून मागासवर्गीयांना विभाजित केले जात आहे. त्यासाठी सर्वांनी संविधानिक हक्काची जाणीव करून एकत्र येणे ही सर्वांची गरज आहे. सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संविधानाने माणूस म्हणून मागासवर्गीयांना जे अधिकार दिले, त्या अधिकारांची जाणीव सर्वांनी करून घेतली पाहिजे. सर्वांनी चिकित्सक असले पाहिजे. संविधानाने जे हक्क व अधिकार दिले, ते टिकवून ठेवणे आमची सर्वांची सामाजिक आणि संविधानिक जबाबदारी आहे, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. आंदोलनाचे काम हे संघटनात्मक आणि सामूहिक काम म्हणून करायचे असते. आरक्षण विरोधी आंदोलनाचे हे लोन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गेले पाहिजे, यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्न करावे, जिल्ह्यातील आंदोलन संघटन कौशल्याच्या जोरावर यशस्वी करावे, असे आवाहन कुतीरकर यांनी यावेळी केले.
ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांनी जिल्ह्यामध्ये आरक्षण हक्क कृती समितीच्या माध्यमातून होत असलेल्या जाणीव-जागृतीसाठी होत असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक प्रश्नांना घेऊन लोकांपर्यंत गेल्यास आंदोलन निश्चित यशस्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला, तसेच येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही, हेही सांगितले.
आरक्षण हक्क कृती समितीचे सहसंयोजक गौतम मेश्राम व देवानंद फुलझेले यांनी आरक्षण हक्क कृती समिती करीत असलेल्या प्रयत्नांचा परामर्श घेतला. यावेळी भरत येरमे, विजय बंसोड, माधवराव गावळ, अशोक मांदाडे, ओमप्रकाश साखरे, मनोज गेडाम, प्रवीण सहारे, सूरज कोडापे, संदीप रहाटे, शालिक मानकर आदींनी आपापल्या संघटनात्मक कामाचा व तालुक्याचा अहवाल सादर केला. प्रास्ताविक भामरागड तालुका प्रमुख धर्मानंद मेश्राम, संचालन देवेंद्र सोनपिपरे तर आभार श्याम रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून विविध संघटनांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित झाले होते.