संघर्षमय युगात समाज संघटनेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:38+5:302021-03-16T04:36:38+5:30
गुड्डीगुडम येथील गोटूल भूमी पटांगणावर गाेंडवाना समितीच्या वतीने वीर शहीद बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन ...

संघर्षमय युगात समाज संघटनेची गरज
गुड्डीगुडम येथील गोटूल भूमी पटांगणावर गाेंडवाना समितीच्या वतीने वीर शहीद बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीचे संस्थापक-अध्यक्ष संदीप कोरेत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा महाग्रामसभा संघटक शिवाजी नरोटे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून स्वायत्त परिषदेचे सचिव नितीन पदा, ग्रामसभेचे पदाधिकारी दिनेश वड्डे, तिमरमच्या सरपंच सरोजा पेंदाम, माजी सरपंच महेश मडावी, माजी उपसरपंच आनंदराव पेंदाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप सिडाम, प्रचारक समय्या पेंदाम उपस्थित होते. सर्वप्रथम आदिवासी समाजाचे दैवत सल्ला गांगरा शक्तीची पूजाअर्चा केली. त्यानंतर, वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा, कुपार लिंगो यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व गावातून फेरी काढण्यात आली. फेरीनंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या दशा, दिशा व समस्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काेयापुनेम प्रचारक सत्यनारायण कोडापे, संचालन कमलापूरचे भूमक बापू आत्राम, तर आभार ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पेंदाम यांनी मानले.
यशस्वितेसाठी प्रचारक अनिल पेंदाम, गाेटूल समिती अध्यक्ष संपत मडावी, सचिव राकेश मडावी, रवींद्र मडावी, चंद्रकांत कोडापे, अशोक आत्राम, रामकांत पेंदाम, विनोद सोयाम, गंगाराम आत्राम, सीताराम पेंदाम, मोहनिश पेंदाम, संजू सिडाम, रमेश कोरेत, चंदू तलांडी यांनी सहकार्य केले. यावेळी गुड्डीगुडम येथील आदिवासी समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.