वैभवशाली आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याची गरज - जीवन नाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:24+5:302021-08-13T04:41:24+5:30
पुराडा येथे जागतिक आदिवासी दिन व गोटूल भवन बांधकाम उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. ...

वैभवशाली आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याची गरज - जीवन नाट
पुराडा येथे जागतिक आदिवासी दिन व गोटूल भवन बांधकाम उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी होते. आदिवासी धार्मिक ध्वजारोहण समाजाचे अध्यक्ष श्रीराम पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पुराडाचे सरपंच अशोक उसेंडी, प्राचार्य सी.एल. डोंगरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन दिघोळे, डॉ. ठलाल, पोलीस पाटील दत्तू डोंगरवार, ग्रा.पं. सदस्य प्रिया धुपजारे, चंद्रकला कोल्हे, संगीता रक्षा, संजय गंगाचौधरी, जयवंता हलामी, दयाराम बोगा, वासुदेव उसेंडी, दयाराम हलामी, शालिक सयाम, हरिश्चंद्र टेकाम व समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमात समाज संघटनेच्या वतीने हरिश्चंद्र टेकाम व सरपंच अशोक उसेंडी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अशोक उसेंडी, संचालन शिक्षक रामनाथ नरोटे तर आभार सचिन तोफा यांनी मानले.
100821\01583737img_20210810_144231.jpg
मार्गदर्शन करताना जिवन नाट