व्यवहारात वाचन संस्कृती रुजण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:52+5:302021-06-21T04:23:52+5:30

महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे ऑनलाइन राष्ट्रीय वाचन दिन समारंभ प्रसंगी प्रमुख ...

The need to inculcate a reading culture in practice | व्यवहारात वाचन संस्कृती रुजण्याची गरज

व्यवहारात वाचन संस्कृती रुजण्याची गरज

महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे ऑनलाइन राष्ट्रीय वाचन दिन समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा यांनी राष्ट्रीय वाचन दिनाचे महत्त्व सांगितले. वाचन हा ज्ञानसंग्रहाचा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. पुस्तक हे चांगल्या मित्राची भूमिका निभावत असून, पुस्तकांमुळे जीवनात सकारात्मक विचार रुजत असतात, असे सांगितले. वाचन करताना आपला विवेक जागृत असावा, आपण नेहमी चांगल्या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे, असे त्यांनी सपष्ट केले. यावेळी स्व.पी.एन. पॅनीकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक ग्रंथालयप्रमुख डॉ.किशोर वासुर्के, संचालन प्रा.गजानन बोरकर तर आभार प्रा.शशिकांत गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.सुनील चुटे, डॉ.सतीश कोला, प्रा.डॉ.विजय रैवतकर, प्रा.प्रियदर्शन गणवीर, सचिन काळबांधे यांनी सहकार्य केले.

Web Title: The need to inculcate a reading culture in practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.