बहुजनांना एकत्रित संघर्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:20 IST2017-11-01T00:19:39+5:302017-11-01T00:20:36+5:30

आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ....

The need for a combined struggle for the Bahujans | बहुजनांना एकत्रित संघर्षाची गरज

बहुजनांना एकत्रित संघर्षाची गरज

ठळक मुद्देपितांबर कोडापे यांचे प्रतिपादन : मुधोली रीठ येथे बहुजन युवा संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विचारवंत तथा देसाईगंजचे विस्तार अधिकारी डॉ. पितांबर कोडापे यांनी केले.
भीम मैत्री युवा संघ मुधोली रीठद्वारा बहुजन युवा संमेलनाचे आयोजन मुधोली रीठ येथे करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान ‘आदिवासी विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक आव्हाने व उपाय, दशा आणि दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. पितांबर कोडापे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक नंदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चामोर्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कैलाश नगराळे, धर्मानंद मेश्राम, निकोडे, कुसनाके प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पितांबर कोडापे, अ‍ॅड. संदेश भालेकर, प्रा. सुचिता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. कोडापे म्हणाले हजारो वर्षांपासून या देशातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, बहूजन समाजातील नागरिकांचे शोषन होत आले आहे. स्वातंत्र्यानंतरही या समाजाच्या विकासाला पाहिजे त्या प्रमाणात गती मिळाली नाही. आदिवासी समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन नव्या पिढीला आदर्श घालून द्यावा. प्रतिगाम्यांच्या राज्यात जाती-जातीमधील वैरभाव विसरून एकत्र वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विक्की देवतळे, संचालन महेंद्र देवतळे तर आभार डॉ. देवतळे यांनी मानले.

Web Title: The need for a combined struggle for the Bahujans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.