कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:56+5:302021-01-10T04:27:56+5:30

वयोवृध्दांना नियमित मानधनाची मागणी रांगी : वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या वयोवृध्द नागरिकांना शासनाच्या योजनेतून दरमहा मानधन देण्याची योजना ...

The need for backyards in malnourished areas | कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज

कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज

वयोवृध्दांना नियमित मानधनाची मागणी

रांगी : वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या वयोवृध्द नागरिकांना शासनाच्या योजनेतून दरमहा मानधन देण्याची योजना आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे तीन ते चार महिन्यांचे मानधन थकीत राहते.

अनेक तलाठ्यांचा मुख्यालयाला खो

एटापल्ली : तलाठ्यांना मुख्यालयाची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी साजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे.

पाणी टाकीची सुरक्षा वाऱ्यावर

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गतिरोधकाअभावी अपघातास आमंत्रण

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.

मानधनाअभावी वृद्ध कलांतांची ससेहोलपट

देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतापुढे वृध्दापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंताकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करा

एटापल्ली : जिल्ह्यात सिकलसेल वाहक रुग्णांची संख्या १० ते १२ हजारांवर आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्याने सिकलसेल संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.

कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले

एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत.

कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान

गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाही.

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा

गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.

मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

शहरातील डुकरांचा बंदोबस्त करा

आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगर पंचायतीचे या डुकरांचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे.

संवेदनशील भागासाठी रुग्णवाहिका द्या

कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये- जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह विविध परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात.

मद्यपी चालकांना मुभा

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मद्यपी चालक सुसाट वेगात असतात.

Web Title: The need for backyards in malnourished areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.