नैैसर्गिक प्रक्रियेची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:31 IST2018-03-19T00:31:46+5:302018-03-19T00:31:46+5:30

मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत.

Need for awareness of the natural process | नैैसर्गिक प्रक्रियेची जागृती हवी

नैैसर्गिक प्रक्रियेची जागृती हवी

ठळक मुद्देपल्लवी आमटे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे किशोरी कार्यशाळा; ३५० मुली सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत. परिणामी किशोरवयीन मुलींमध्ये वेगळीच भीती व संकोचाची भावना निर्माण होते. त्यामुळे मासिक पाळी या नैैसर्गिक प्रक्रियेबद्दल किशोरींमध्ये जाणीव जागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवनच्या पल्लवी आमटे यांनी केले.
देसाईगंज येथे राष्ट्रीय महिला आयोग व आरोग्य प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने हटवार मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यशाळेत विशेष मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत झोडे, आहारतज्ज्ञ श्रद्धा गोटमारे, कला शिक्षक सतीश डांगे, विशेष अतिथी म्हणून जयश्री पराते, भाऊराव पत्रे, सहारे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या ५१ क कलमातील मसुद्याच्या पोस्टरच्या औपचारिक अनावरणाने झाली. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे व विज्ञाननिष्ट दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विचार करण्यासाठी हे कलम अंगिकारण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभणे, संचालन ओमेश्वरी पुराम तर आभार अर्चना गभणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती पुराम, पद्मजा मेहंदळे, विष्णू दुनेदार, खान, सगदेव, नाकाडे, राधिका बावनकुळे, संध्या कोवे, ए. एम. गजभिये, शर्मिला दहीकर यांनी सहकार्य केले. किशोरी कार्यशाळेत ४ जिल्ह्यातील २५ शाळा-महाविद्यालयामधून ३५० मुली सहभागी झाल्या.
बदलासह शरीर विज्ञानावर मार्गदर्शन
कार्यशाळेत डॉ. प्रशांत झोडे यांनी स्त्री-शरीर विज्ञान, पाळीच्या संबंधी तक्रारी याविषयी माहिती सांगून मुलींच्या अनेक शंकांचे निसरण केले. पुढील सत्रात पल्लवी आमटे यांनी स्त्री-पुरूष नैैसर्गिक लिंगभेदापासून सुरूवात करून मुलगी वयात येतानाचे बदल, मासिक पाळी म्हणजे काय, याबाबत मार्गदर्शन केले. मुला-मुलींना वयात येताना होणारे बदल सांगणे फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जयश्री पराते यांनी केले. श्रद्धा गोटमारे यांनी किशोरवयीन मुलींनी आहाराबाबत जागकता बाळगावी, सर्वप्रथम पोटातील भूकेचा विचार करावा, असे मार्गदर्शन केले.

Web Title: Need for awareness of the natural process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.