खरिपासाठी ३० हजार क्विंटल बियाणांची गरज

By Admin | Updated: May 16, 2017 00:45 IST2017-05-16T00:45:07+5:302017-05-16T00:45:07+5:30

खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

Need of 30 thousand quintals of seed for Kharif | खरिपासाठी ३० हजार क्विंटल बियाणांची गरज

खरिपासाठी ३० हजार क्विंटल बियाणांची गरज

हंगाम तोंडावर : धानासाठी सर्वाधिक बियाणे लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २९ हजार ३९६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.
गडचिरोली जिह्यातील हवामान व शेतजमीन धानपिकासाठी पोषक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक धानपिकाची लागवड करतात. खरीप हंगामात सुमारे २ लाख २३ हजार ९८५ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या धानपिकाची लागवड २ हजार ३०० हेक्टरवर होणार आहे. त्यामुळे धानपिकाच्या बियाणांची सर्वाधिक गरज भासते. २०१७-१८ च्या खरीप हंगामात २६ हजार ७४० क्विंटल धानाच्या बियाणांची आवश्यकता भासेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीन पिकाची लागवड ३ हजार ७३० हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी २ हजार १०० क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. तूर पिकाची पेरणी ७ हजार ९४६ हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी ३५० क्विंटल तूर बियाणांची गरज भासणार आहे. जिल्ह्यात कापसाचा व मक्याचा पेरा वाढत चालला आहे. सोयाबीन खालील क्षेत्रावर आता कापसाची लागवड केली जात आहे. यावर्षी १२ हजार हेक्टरवर कापूस तर १ हजार २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. कापसासाठी १६२ क्विंटल तर मक्क्यासाठी १२५ क्विंटल बियाणांची आवश्यकता भासणार आहे. उडीताचे ३ क्विंटल, तिळ ११ क्विंटल बियाणांची गरज पडणार आहे. कृषी विभाग राज्य शासनाच्या कंपन्यांकडून १६ हजार ७३९ तर खासगी कंपन्यांकडून १२ हजार ६५७ क्विंटल बियाणे मागविणार आहे.
दरवर्षी ऐन पेरणीच्या वेळेवर बियाणांची टंचाई जाणवते. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जातो. असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच नियोजन केले आहे. पेरणीपूर्वी पुरेशाप्रमाणात बियाणे उपलब्ध होतील. यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांचा घरगुती बियाण्यांवर भर
घरचे धान्य बियाणे म्हणून वापरण्यासाठी त्याच्यावर कोणत्या प्रक्रिया करण्यात याव्या, याबाबत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. बियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडीलच धान्य खरेदी करतात. त्यांच्यावर थोडीफार प्रक्रिया केल्यानंतर तेच बियाणे शेतकऱ्यांना चारपट अधिक किंमतीने विकले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी स्वत:कडचेही बियाणे वापरत आहेत. दरवर्षी केवळ ३३ टक्केच बियाणे खरेदी केले जातात. उर्वरित ७० टक्के बियाणे शेतकरी स्वत:कडचे वापरतात.
मागील वर्षीप्रमाणे चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना बियाणांची टंचाई जावणार नाही. मात्र पावसाने दगा दिल्यास बियाणांची मागणी वाढू शकते.

Web Title: Need of 30 thousand quintals of seed for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.