राष्ट्रवादीच्या प्रदेश निरीक्षकांनी घेतला पक्षाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:37+5:302021-06-22T04:24:37+5:30

येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युकाँचे जिल्हा निरीक्षक जगदीश पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर ...

NCP's state inspectors took stock of the party | राष्ट्रवादीच्या प्रदेश निरीक्षकांनी घेतला पक्षाचा आढावा

राष्ट्रवादीच्या प्रदेश निरीक्षकांनी घेतला पक्षाचा आढावा

येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युकाँचे जिल्हा निरीक्षक जगदीश पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर , महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, महिला जिल्हा निरीक्षक वंदनाताई आवळे, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित हाेते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात आला.

बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकास विषयक चर्चा तसेच पक्ष वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविणे, कार्यकारिणी गठित करणे, येणाऱ्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून बूथ कमिट्या स्थापित करणे व इतर विविध समस्या व अनेक विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

यावेळी महिला विभाग सचिव सोनाली पुण्यपवार, विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे, शहराध्यक्ष अमीन लालानी, तालुकाध्यक्ष संदीप ठाकूर, ज्योतीताई सोनकुसरे, चेतन ढवळे, अमोल उके, कुलदीप सोनकुसरे, अनिल साधवानी, मनोज ढोरे, लतीफ शेख, अन्वरभाई सय्यद, तपन मल्लिक, नारायण सरकार , सुरेश फुकटे, सदाशिव भांडेकर, रोशन भोयर तसेच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

===Photopath===

210621\img_20210621_133909.jpg

===Caption===

आरमोरी येथे आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश निरीक्षक श्रीकांत शिवणकर व राष्ट्रवादी चे पदाधिकारी

Web Title: NCP's state inspectors took stock of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.