राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली काेविड सेंटरची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:50+5:302021-05-08T04:38:50+5:30
कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली काेविड सेंटरची माहिती
कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून कोविडसंदर्भात माहितीवजा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात कोविडचे संक्रमण वाढत असून, मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर्सची पाहणी केली जात आहे. याशिवाय शासकीय वसतिगृहात असलेल्या तालुक्यातील दोन कोविड सेंटर्सच्या ठिकाणी भेटी देऊन रवींद्र वासेकर यांनी डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाेबत संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या समस्या व विशेष सहकार्याकरिता राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी राकाॅंचे जिल्हा सचिव संजय कोचे, युवक सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ.कमल परसवानी, डाॅ. जगदीश बोरकर, पुरवठा अधिकारी सूरज ढोणे आदी उपस्थित हाेते.
देसाईगंज तालुक्यातील कोविड सेंटर भगतसिंग वार्ड व गोकुळनगरातील कोविड सेंटरला राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांबोळे यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तालुक्यात याेग्य उपचाराची सोय नसल्यामुळे किरकाेळ आजारी रुग्णांना गडचिरोलीला पाठवावे लागते त्यामुळे देसाईगंजच्या रुग्णालयात व काेविड सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष भुवन लिल्हारे, शहर अध्यक्ष लतीफ शेख, सोशल मीडिया विभाग तालुका अध्यक्ष कपिल बोरकर, रायुकाॅंचे शहर अध्यक्ष दीपक नागदेव, भरत देहलानी आदी उपस्थित होते.
आरमाेरीच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची विचारपूस करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुमारी उईके यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, शहर अध्यक्ष अमीन लालाणी उपस्थित होते.
===Photopath===
070521\07gad_5_07052021_30.jpg
===Caption===
कुरखेडातील काेविड केअर सेंटरला भेट देवून डाॅंक्टरांकडून माहीती जाणून घेताना राकाॅचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर