नक्षल्यांनी हिंसाचार थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:45+5:30

कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे.

Naxals should stop violence | नक्षल्यांनी हिंसाचार थांबवावा

नक्षल्यांनी हिंसाचार थांबवावा

Next
ठळक मुद्देजाळपोळीच्या घटनांमुळे हानी : मानवाधिकार परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादी हे हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांच्या माध्यमातून विकासात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा नक्षल पीडित पुनर्वसन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र डोंबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे.
कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे. नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवावा, असे आवाहन गजेंद्र डोंबळे यांनी केले.
पत्रकार परिषदेला मानवाधिकार परिषदेचे नरेंद्र पुंगाटी, विश्वनाथ मडावी, मनोज कांदो, मधुकर उसेंडी, मंगेश कामडी, जामिनी कुलसंगे, साईनाथ पेंडालवार, योगेंद्र बांगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Naxals should stop violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.