गडचिरोली जिल्ह्यात पोलीस मदत केंद्राजवळ नक्षल्यांकडून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 20:04 IST2021-04-22T20:04:22+5:302021-04-22T20:04:41+5:30
Gadchiroli news एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्राजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे सतर्क होऊन पोलिसांनीही सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही.

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस मदत केंद्राजवळ नक्षल्यांकडून गोळीबार
ठळक मुद्देहॅन्डग्रेनेडचाही वापर, कोणीतीही हानी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्राजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे सतर्क होऊन पोलिसांनीही सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षल्यांनी गोळीबार केला. एवढेच नाही तर एक हॅन्डग्रेनेडही फेकला. पण तो निकामी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. नक्षलवाद्यांची चाल ओळखत पोलिसांनी सावधपणे प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. सकाळपासून त्या भागात शोधमोहीम वाढविण्यात आली.